
अश्विनी देशकर
आज महिलांना त्यांचे रंग रुप आणि वजनावरून अनेकदा लोक टोमणे मारतात. शरीराचा बांधा, रंग बघून अनेकदा लग्नाच्या वेळी त्यांना नकार पचवावा लागतो, परंतु ज्या देशात पहिल्या महिला राष्ट्रपती, अंतराळवीर, खेळाडू तयार होऊ शकतात. त्याच देशात महिलेचे रंग, रुपाबाबत त्यांना ऐकून घ्यावे लागते. आज कोणतेही असे क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत नाहीत. परंतु तरीही त्यांना विविध कारणांवरून समाज नाव ठेवतो असे दिसून येते.