India Book Of Records : स्वान्त सुखाय साकारतो काष्ठशिल्प; जयंत तांदुळकर, स्वनिर्मित वस्तूंचा संग्रह, बनवले अनेक रेकॉर्ड
Nagpur News : नागपूरचे जयंत तांदुळकर यांचा काष्ठशिल्प साकारण्याचा छंद त्यांच्या सर्जनशीलतेला झळाळी देतो आहे. त्यांनी तयार केलेल्या मिनिएचर वस्तूंमुळे त्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
नागपूर : कला माणसाला समृद्ध करते, आनंद व सुख देते. या आनंदाच्या शोधातच मी काष्ठशिल्प कलाकृती साकारतो, असे प्रतिपादन आपल्या शिल्पांच्या माध्यमातून विक्रमांना गवसणी घालणारे शिल्पकार जयंत तांदुळकर यांनी केले.