नागपूर - जागतिक आरोग्य दिनाच्या पर्वावर राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयामध्ये विमाधारक कामगारांव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य जनतेला उपचार खुले करण्यात आले. मात्र, २२ दिवस लोटल्यानंतरही नागपूरच्या कामगार रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य विमा योजना, आयुष्यमान योजनेअंतर्गत एकाही सर्वसामान्य रुग्णावर उपचार झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.