
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायमूर्तीची आठ पदे रिक्त आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये यात दोन पदांची भर पडणार असून एकूण दहा पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे, वेळीच रिक्त पदे ह भरल्यास येणाऱ्या काळात न्यायालयीन कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता विधी क्षेत्रातून वर्तविली जात आहे.