World Book Day 2024 : जीवन संस्कृतीशी चिंतनशील नाते जोडणारे ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’

World Book Day 2024 : मानव संस्कृतीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व आध्यात्मिक क्षेत्रात नदीचे अलीकडचे महत्व या पुस्तकात लेखक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी अधोरेखित केले आहे.
World Book Day 2024
World Book Day 2024 esakal

स्मिता काळे (मुख्याधिकारी, शिरुर नगरपरिषद, जि.पुणे)

World Book Day 2024 : नदीचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण यावर काम करायचे होते. पण मुळात एकूणच समस्या व उपाय समजून घेण्याचा विचार मनात घोळत असताना अचानक ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’ हे पुस्तक वाचण्यात आले. मानव संस्कृतीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व आध्यात्मिक क्षेत्रात नदीचे अलीकडचे महत्व या पुस्तकात लेखक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी अधोरेखित केले आहे.

मी वाचलेलं पुस्तक - शुष्क नद्यांचे आक्रोश लेखक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

प्रशासकीय सेवेत धोरणांची अंमलजावणी करीत असताना उत्तम पुस्तकांच्या वाचनाचा खूप उपयोग होतो. ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’ हे पुस्तक ३ विभागात असून पहिल्या भागात नद्यांचे भौगोलिक महत्त्व, ऐतिहासिक मागोवा, नदी खोऱ्याचा इतिहास यांचा मागोवा घेतला आहे.

दुसऱ्या भागात नदी आणि मानव विकास यांचा आढावा घेतला आहे, तर तिसऱ्या विभागात नद्यांची सध्याची परिस्थिती, धरणे, नदी प्रदूषण व एकंदरीत नद्यांच्या समस्यांचा आढावा लेखक रा. श्री. मोरवंचीकर यांनी घेतला आहे.

नदी आणि माणूस यांच्या परस्पर संबंधाच्या विविध पैलूंवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. ते स्पष्ट करताना भारतातीलच नव्हे तर जगातील विविध नद्यांच्या खो-यांचा विकास, त्यांच्यामुळे तेथील जनसमुदायाला कसा आकार प्राप्त झाला, यावर त्यांनी भाष्य केले आहे.

वाढत्या नागरिकरणाबरोबर नद्या कशा प्रदूषित होत चालल्या आहेत, याचे चित्रण विचार करायला लावण्यासारखे आहे. नद्यांच्या आक्रोशाचा शोध घेताना मानवी व्यवहारामुळे नदी आत्महत्या करीत आहे, असे सांगून वेळीच यावर आपण प्रतिबंध घातला पाहिजे हे लेखक या पुस्तकातून सुचवितात.

डॉ.मोरवंचीकर म्हणतात त्याप्रमाणे, मानवी जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारे सर्व संस्कार जलाशी विशेषत: नदीशी निगडित आहेत. जीवनाच्या बंधनातून केवळ परमेश्वर किंवा नदीच मोक्ष देवू शकते अशी खास करून भारतीयांची धारणा असल्या कारणाने आपण जीवनदायी असलेल्या नदीलाही मातृत्व प्रदान केले आहे.

कृतज्ञतेच्या कल्पनेतून नद्यांना मातेचा सन्मान देण्यात आला आहे. नदीला लोकमाता म्हणून गौरविले आहे. ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, विषयात गुंतलेल्या जीवाला अन्य कसलेच भान नसते. स्वत:ला विज्ञाननिष्ठ समजत असलेल्या मानवाच्या या वर्तनाचे समर्थन कसे काय करणार ? तो जर नियमात राहणार नसेल तर त्याचा अस्त निश्चित आहे.

पुस्तकातून काय प्रेरणा मिळते?

कधी ना कधी हे सर्व पंचमहाभूतात विलीन होणार आहे. मग मानवाच्या विघातक कृती निमित्तमात्रच ठरणार का ? या सर्व पंचमहाभूतांचा नाश होणारच आहे. तर मग माणसाने या जलतत्व आणि भूमीतत्वाचा ऱ्हास करणाऱ्या काही विघातक कृती केल्या, तर या तत्वांचा ऱ्हास होण्यात माणसाच्या या कृती निमित्तमात्रच ठरतात का? मातृवत मानल्या जाणाऱ्या नदीला, जलाला प्रदूषित करण्याची बुध्दी माणसाला होतेच कशी ?

माझं ऑल टाईम फेव्हरेट पुस्तक

सेपियंस- लेखक युवाल नोवा हरारी

वाचलीच पाहिजे अशी पुस्तके :

१) अर्थाच्या शोधात- व्हिक्टर फ्रॅंकलिन

२) हो शोध वेगळा- ओशो (यांची इतरही पुस्तके)

३) इश्क में शहर होना- रविशकुमार (कवितासंग्रह)

४) आलोक- आसाराम लोमटे (कथासंग्रह)

५) व्यासपर्व- दुर्गा भागवत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com