
Hemophilia Awareness: आज विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मात्र काही व्याधी, रोग एवढे भयंकर आहेत की, विज्ञानाला देखील त्यावर मात करणे शक्य झाले नाही. हिमोफिलिया त्याच प्रकारचा आजार आहे. जागतिक स्तरावर हिमोफिलिया-ए हा विकार पाच हजार बालकांमागे एकाला आढळतो. हिमोफिलिया-बी हा विकार तीस हजार बालकांमागे एका बालकामध्ये आढळून येतो.