esakal | नागपूर - साहित्यिक आणि समीक्षक आशा सावदेकर यांचं निधन

बोलून बातमी शोधा

asha savadekar

सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक आशा सावदेकर यांचे गुरूवारी सकाळी निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नागपूर - साहित्यिक आणि समीक्षक आशा सावदेकर यांचं निधन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक आशा सावदेकर यांचे गुरूवारी सकाळी निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावदेकर यांचा मुलगा अश्विन हा सध्या अमेरिकेत राहतो. आशा सावदेकर यांचा नातू मुंबईत शिकत आहे. आशा सावदेकर यांना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्मृतीभ्रंशांचा त्रास होता. याकाळात त्या सोनेगाव एचबी ईस्टेट परिसरात नातेवाईकांसोबत राहत होत्या. त्याची काळजी घेण्यासाठी एक केअरटेकरसुद्धा होती.

सावदेकर यांची मुलगी अपर्णा दासगुप्ता हिचे हृदयविकारानं निधन झालं होतं. त्यानंतर सावदेकर या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. पतीचेही त्याआधी निधन झाले होते. गेल्या आठ दहा वर्षातील या घटनांमुळे त्या अस्वस्थ होत्या.

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आशा सावदेकर यांच्या औषध गोळ्याही सुरु होत्या. मात्र त्याही वेळेवर घेण्याचं लक्षात राहत नसे. सावदेकर यांच्यावर वैद्यकीय उपचार डॉक्टर निखिल करत होते. मुलगा अमेरिकेत असल्यानं डॉक्टर निखिल हेच सावदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती मिळते.