Yavatmal Crime: महिलेचं ३० ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं, पोलिसांकडून अटक

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत दोघांना अखेर येथील अवधुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज रविवारी (ता.१४) शहरातील तायडेनगर व आदर्शनगर परिसरात करण्यात आली.
Yavatmal Crime: महिलेचं ३० ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं, पोलिसांकडून अटक

Yavatmal Chain Snatching Crime: महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सराईत दोघांना अखेर येथील अवधुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज रविवारी (ता.१४) शहरातील तायडेनगर व आदर्शनगर परिसरात करण्यात आली.

फैजान शेख (वय २२, रा. आदर्शनगर) व नाजीम खान (वय २१, रा. तायडेनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. महात्मा फुले सोसायटीत गेल्या पाच जानेवारीला रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ३० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दोघांनी हिसकावले होते.

सहा जानेवारीला शहरातील सुभाषनगर परिसरात ही घटना घडली. दहा जानेवारीला धामणगाव बायपास व उमरसरा परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या होत्या. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले होते. एका पाठोपाठ एक घटना शहरातील लोहारा, अवधुतवाडी व शहर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड व अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश एलसीबीसह स्थानिक पोलिसांना दिले. त्यावरून एलसीबीसह स्थानिक पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. चोरटे शहरातील आदर्शनगर व तायडेनगरात असल्याची गोपनीय माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ठिकाणी धाव घेत त्या दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, अवधुतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रताप बोस, पथकातील कमलेश भोयर, सागर चिरडे, बलराम शुक्ला, रुपेश ढोबळे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भाकडे करीत आहेत. (Latest Marathi News)

Yavatmal Crime: महिलेचं ३० ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं, पोलिसांकडून अटक
Weather Update: धुक्यांचा परिणाम विमान, रेल्वे प्रवासावर; तीव्र धुक्यामुळे पुण्याहून १० विमाने रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com