

Late Night Turns Fatal: Friend Murdered with Stone in Yavatmal District
Sakal
यवतमाळ: दारूच्या नशेत चक्क मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. पाच) सकाळी उघडकीस आली. चापडोह शिवारात रेल्वेच्या निर्माणाधीन कामाजवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. ही माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, मारेकरी मित्राला पोलिसांनी लगेच अटक केली.