
अविनाश साबापुरे
यवतमाळ : महाराष्ट्रातील नक्षली कारवायांना गेल्या काही दिवसात मोठे हादरे दिले जात आहेत. त्यातूनच आता नक्षलग्रस्त भागांची यादी शासनाने सुधारित केली आहे. मात्र या ‘सुधारणे’चा वेगळाच फटका तब्बल 21 तालुक्यांतील हजारो कर्मचार्यांना बसला आहे. संबंधित तालुके नक्षलग्रस्त यादीतून निघाल्याने कर्मचार्यांचा भत्ता रोखण्याचे आदेश निघाले आहेत.