Yin Summer youth summit 23: शिक्षणाशिवाय दुसरा समर्थ पर्याय नाही;डॉ. प्रमोद गिरी

ज्ञान मिळवण्यासाठी, यशाकडे झेप घेण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा समर्थ पर्याय नाही
 प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे
प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडेsakal

मोठे उद्योग उभारणे ठिक आहे, उद्योगात यश मिळवणेही मान्य आहे. परंतु त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे शिक्षण. शिक्षणातून ज्ञान मिळवणे हेच प्रगतीचे साधन आहे. ज्ञान मिळवण्यासाठी, यशाकडे झेप घेण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा समर्थ पर्याय नाही, असे सांगताना मी कधीच शिक्षणाची कास सोडली नाही, असे मत जागतिक पातळीवरचे मेंदू शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी यांनी आज व्यक्त केले.

 प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे
Nagpur : युद्ध सुदानमध्ये आणि भारतातल्या भाज्यांचा रस्सा होतोय पातळ, काय आहे कारण घ्या जाणून घ्या

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘यिन’च्या ‘चला घडू या देशासाठी’ या समर युथ समीटमध्ये डॉ. गिरी बोलत होते. ते म्हणाले, आपल्या जीवनात आई सारखा प्रेरणास्रोत नाही. आईच पहिल्यांदा शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगते. यामुळे शिक्षण परिवर्तनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा शिक्षण पाया आहे, असे मी मानतो. ज्या यशस्वी उद्योजकांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, त्यांनी शिक्षण नसल्याची खंत व्यक्त केली. यामुळे उद्योजक म्हणवून करियर करायचे असेल तरी शिक्षणाची कास सोडू नका, असे सल्ला डॉ. गिरी यांनी दिला.

 प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे
Yin Summer youth summit 23 संधीचे सोने करून जगा आनंदी

वैद्यकीय व्यवसायात पैसा कमविणे हा बाय प्रॉडक्ट आहे. परंतु रुग्णांकडे मी कधीच ग्राहक म्हणून बघत नाही. तर रुग्ण हा मी माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून बघतो, यामुळेच रेल्वेस्थानकावर असलेल्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी न्युरॉनमध्ये असते, असे डॉ. गिरी म्हणाले. शिक्षणामुळेच ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्य भारतात पहिल्यांदा आणले आणि न्युरॉनमध्ये आतापर्यंत दीड लाख मेंदूच्या रुग्णांचे पुनर्वसन करण्याची किमया साधली गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com