केबलवर युवकाची उडी, क्षणात कोळसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

केबलवर युवकाची उडी, क्षणात कोळसा

नागपूर - रेल्वेची विद्युत यंत्रणा असलेल्या ‘ओएचई’ केबलवर एका युवकाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. संकेत रवराळे (३४) रा. अमरावती असे मृताचे नाव आहे.

मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक ४-५ च्या फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)वर आला. संकेत याने क्षणाचाही विचार न करता रेल्वेची वीज वाहिनी असलेल्या ‘ओएचई’ केबलवर उडी घेतली. रेल्वे चालविण्याची क्षमता असलेल्या या वीज वाहिनीवर त्याने उडी घेताच, त्याचा कोळसा झाला. ही माहिती रेल्वे स्टेशन मास्टर, लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफला माहिती होताच तत्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच संकेत याला मेयोत नेले. मात्र, डॉक्टरांनी स्थिती पाहून त्याला लगेच मेडिकल रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे दाखल करताच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो उडी घेत असताना स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संकेत याला आई-वडील आणि भाऊ आहे. तो कुठलाही कामधंदा करीत नव्हता. त्याच्याकडे असलेल्या आधारकार्डवरून ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना सूचना केली. मात्र, त्याने उडी का घेतली याचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Young Man Commits Suicide By Jumping On Ohe Cable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top