नागपूर : अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयवंतनगरातील ओयो एनएक्स हॉटेलमध्ये २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. .श्रृतिका वाघमारे (मिरे) असे युवतीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून ती ओंकारनगरातील जयवंतनगरात असलेल्या ओयो एनएक्स व्हील या हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. .आज सकाळी ती खोलीत असताना प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेलमधील नोकरांनी व्यवस्थापकाला माहिती दिली. दरम्यान त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असताना, त्यांना श्रृतिकाचा मृतदेह आढळला. .यावेळी तिच्या बाजूला काही ईसीजी रिपोर्ट आणि वैद्यकीय तपासणीचे कागदपत्रही होते. त्यांनी याबाबत अजनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ हॉटेल गाठून तपासणी सुरू केली. यावेळी सर्व कागदपत्र पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर पंचनामा करीत, मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.