Nagpur Crime : ती स्वप्नात येते, मला बोलाविते; ‘बेस्टफ्रेन्ड’च्या आत्महत्येनंतर तरुणीचा टाेकाचा निर्णय

ती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार मोठ्या भावाने दाखल केली होती
young woman suicide of her best friend suicide police nagpur crime
young woman suicide of her best friend suicide police nagpur crime esakal
Updated on

नागपूर : ‘बेस्टफ्रेंड स्वप्नात येऊन मला बोलाविते’. त्यामुळे सातत्याने तणावात असलेल्या २२ वर्षीय युवतीने विहिरीत उडी घेत आत्महत्या करीत, जीवन संपविले. ही घटना बुधवारी (ता.१४) वाठोड्यातील संताजीनगरात उघडकीस आली. ती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार मोठ्या भावाने दाखल केली होती.

young woman suicide of her best friend suicide police nagpur crime
Ashadi Wari 2023 : वाऱ्याची झुळूक घेत मोठा टप्पा ओलांडला; पालखी यवतला विसावली; दर्शनासाठी गर्दी

प्रियंका नंदराव सराटे (वय २२, रा. चिराग आईस फ्रॅक्ट्रीजवळ, वाठोडा) असे तरुणीचे नाव आहे. प्रियंका एका चहाच्या दुकानात काम करायची. तिथे तिची संजीवनी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. त्यातून दोघीचीही मैत्री इतकी घट्ट झाली की, त्या एकमेकींना सर्व काही शेअर करायच्या. अनेकदा ती संजीवनीकडे राहायची. मात्र, तीन महिन्यांपूर्वी संजीवनीने अचानक आत्महत्या केली. त्यामुळे प्रियंका तणावात गेली.

young woman suicide of her best friend suicide police nagpur crime
Nagpur : डेंटिस्टच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान; बाल दंतरोग विभागाची मान्यताही धोक्यात?

सातत्याने तिच्या आठवणीत राहायची. आपली मैत्रीण आपल्या स्वप्नात येते व आपल्याला बोलाविते असे ती सांगत असे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका फार तणावात होती. दरम्यान मंगळवारी ती घरातून निघून गेली. त्यानंतर परत न आल्याने मोठ्या भावाने तक्रार दाखल केली. त्यातून पोलिसांनी शोध घेतला. काल तिचा मृतदेह विहिरीत आढळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com