
नागपूर : ‘सकाळ’च्या ‘यिन समर युथ समिट’मुळे तरुणाईमध्ये नेतृत्वगुण तयार होत असून, यामुळे त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळत असल्याने समाजातही सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे मत राज्याचे गृहनिर्माण, शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. बुधवारपासून मोहननगर येथील परवाना भवनात सुरू झालेल्या दोनदिवसीय सकाळ ‘यिन समर युथ समिट २५ : उत्सव तरुणाईचा’ या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.