
नागपूर : पारडी पोलिस स्टेशन परिसरात शनिवारी (ता.२५) सायंकाळी जुन्या भांडणातून चार आरोपींनी युवकावर शस्त्राने वार करण्यासोबतच, विटांनी ठेचून त्याची हत्या केली. युवक खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता. सुडभावनेतून आरोपींनी त्याचा ‘गेम’ केल्याची चर्चा परिसरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.