

Minor Among Six Arrested in Nagpur Youth Murder Case
eSakal
नागपूर: कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पार्वतीनगर परिसरात क्षुल्लक वादातून युवकावर रॉड आणि चाकूने हल्ला करीत त्याचा खून करीत चार जणांना जखमी केले. ही घटना शनिवारी (ता.३) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पार्वतीनगर चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अल्पवयीन मुलासह सहा जणांना अटक केली.