
भिवापूर : नांद नदीला आलेल्या पुरात शनिवारी संध्याकाळी दुचाकीसह वाहून गेलेल्या युवकाचा शोध दुसऱ्या दिवशीही अपूर्ण राहिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाने रविवारी दिवसभर नदीपात्रात आणि परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र अंधार पडताच मोहीम थांबवावी लागली. सोमवारी सकाळपासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात येणार आहे.