Zero Shadow Day : नागपूर जिल्ह्यात आजपासून अनुभवा शून्य सावली दिवस

उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा
Zero Shadow Day from today in nagpur Different latitudes in Maharashtra
Zero Shadow Day from today in nagpur Different latitudes in Maharashtrasakal

नागपूर : वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटांसाठी सोडून जाणार आहे. वाटले ना आश्चर्य. पण हे सत्य आहे. जिल्ह्यात शून्य सावली दिवसाचा अनुभव आता उद्या बुधवारपासून (ता.२४) घेता येणार आहे. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.

सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगवेगळे दिवस आणि वेळा आहेत.

Zero Shadow Day from today in nagpur Different latitudes in Maharashtra
Zero Shaddow Day : पुणेकरांनी अनुभवला ‘सावली नसलेला दिवस’

त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालू शकते असे, स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी कळविले आहे.

अनुभवण्यासाठी साहित्य

शून्य सावली अनुभवण्यासाठी दोन, तीन इंच व्यासाचा ,एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू, व्यक्तीने उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.

जिल्ह्यातील शून्य सावली दिवस

  • २४ मे-भिवापूर(१२.०८)

  • उमरेड(१२.०९)

  • २५ मे-कुही (१२.०९)

  • हिंगणा(१२.१२)

  • बुटीबोरी(१२.११)

  • २६ मे-नागपूर शहर(१२ १०)

Zero Shadow Day from today in nagpur Different latitudes in Maharashtra
Zero Shadow Day : सावली सोडणार साथ; अकोलेकर घेणार शून्य सावलीचा अनुभव
  • कामठी (१२.१०)

  • कळमेश्वर(१२.११)

  • २७ मे-मौदा (१२.०९)

  • रामटेक (१२.१०)

  • काटोल (१२.१३)

  • पारशिवनी (१२.१०)

  • सावनेर (१२.११)

  • २८ मे-नरखेड (१२.१३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com