

नागपूर : ‘फ्रेंडशिप ॲप’वर एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याचे सांगून खोटी माहिती देत मुलीशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाचे नाटक करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या युवकास धंतोली पोलिसांनी अटक केली.
राकेश ओझा (वय २०, रा. जमशेदपूर) असे युवकाचे नाव आहे. तो जमशेदपूर येथील जर्नालिझम महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. राकेश आणि तरुणीची एप्रिलमध्ये ‘क्लब हाउस’ या फ्रेंडशिप ॲपवर भेट झाली. यावेळी त्याने दिल्लीला वास्तव्यास असून एका वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत असल्याची बतावणी केली. दोघांचीही मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यातून जूनमध्ये राकेश ओझा हा नागपूरला आला. त्याने एका हॉटेलमध्ये तरुणीची भेट घेतली.
तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
यादरम्यान त्याने आपल्या मित्राच्या माध्यमातून आईवडील म्हणून तिचा त्यांच्याशी संवाद साधून दिला. यावेळी तरुणीला त्यांनी लग्न केल्यास हरकत नसल्याचेही सांगितले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्याने तिच्याशी लगट करीत तिचे अश्लील व्हिडिओ काढले. मात्र, काही दिवसांनंतर राकेशने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे तरुणीने धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.