esakal | नागपूरची "मारबत' चित्रपटात झळकणार
sakal

बोलून बातमी शोधा

file phote

नागपूरची "मारबत' चित्रपटात झळकणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  ः समाजातील अनिष्ट प्रथांचे आणि प्रवृत्तीचे उच्चाटन करण्यासाठी नागपूर येथून सुरू झालेली "मारबत' लवकरच चित्रपटात झळकणार आहे. "बकाल' चित्रपटाची पार्श्‍वभूमी मारबत परंपरेच्या मूळ संकल्पनेशी जोडली आहे. "घेऊन जा गे मारबत' या गाण्याचा संगीत प्रकाशन सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला.उत्सव साजरा करण्यासाठी आयोजन समितीला येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासकीय मदत देण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले. समीर आठल्ये हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. 135 वर्षे जुन्या मारबत मिरवणुकीवर आजवर एकही आरती अथवा गाणे समर्पित झाले नाही. ते आम्ही प्रथमच करीत असल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले."घेऊन जा गे मारबत' या गीताचे बोल सुरेंद्र मसराम यांचे असून, मोरेश्‍वर निस्ताने यांनी संगीत दिले आहे. आदर्श शिंदे आणि धनश्री देशपांडे यांनी या गाण्यास साज चढविला आहे. धार्मिक बाजाचे देवीला आर्जव करणारे हे गीत विदर्भाच्या लोकसंगीत परंपरेला साजेसे व आबालवृद्धांना ठेका धरायला लावणारे आहे. प्रकाशन सोहळ्यास वनराई फाउंडेशनचे गिरीश गांधी, कथाकार विनोद देशपांडे, नवोदित कलाकार चैतन्य मेस्त्री, जुई बेंडखळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top