
नागपूर: प्रो-हेल्थ फाउंडेशन आणि माइल्स एन माइलर्स एंड्युरन्स स्पोर्टस अकादमीच्या वतीने महाराष्ट्र पोलिस विभाग व नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित टायगर मॅरेथॉनमध्ये रेल्वेचा नागराज खुरसणे व तेजस्विनी लांबकाणे यांनी अव्वल स्थान पटकाविले.
नागराजने 18 ते 35 वयोगटातील 21.1 किमी अंतराची ही शर्यत एक तास 9.17 मिनिटांत, तर तेजस्विनीने 1 तास 27.26 मिनिटांत पूर्ण केली. विकेश शेंडे व देवेंद्र चिकलोंढेने द्वितीय व तृतीय स्थान मिळविले. महिलांमध्ये प्राची गोडबोले व निकिता भुबरेने द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. 10 किमी शर्यतीत शुभम मेश्राम व गीता चाचेरकरने बाजी मारली. शुभमने 30.28 मिनिटे, तर गीताने 37.33 मिनिटे इतकी वेळ नोंदविली. रिषभ तिवसकर व रोहित झाने दुसरे व तिसरे स्थान मिळविले. मुलींमध्ये यामिनी ठाकरे व मृणाली सराफ प्रथम व द्वितीय स्थानाच्या मानकरी ठरल्या. पाच किमी अंतराच्या शर्यतीत सुजल मुठे व तृप्ती पटले विजेते ठरले. तर, तीन किमी अंतराच्या शर्यतीत सर्वज्ञ चामट व विनिता दुर्गापुजारीने अव्वल स्थान मिळविले. याशिवाय 36 ते 45 वयोगटांत प्रमोद उरकुडे व शोभा यादव, 46 ते 55 वयोगटात रवींद्र बालपांडे व विद्या धापूरकर आणि 55 वर्षांवरील वयोगटात राजेंद्र जैस्वाल व जेरेस्टिनने बाजी मारली. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) गजानन राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर व खेळाडूंनी मॅरेथॉन सहभाग नोंदविला.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी मॉइलचे संचालक (वित्त) राकेश तुमाने, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे, जॉन्सन लिफ्ट प्रा. लि.चे विभागीय व्यवस्थापक सुधीर घिके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, क्रिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर अरबट, फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अमित समर्थ आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण पावणेतीन लाखांचे रोख पुरस्कार देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.