
गडचिरोली : धान उत्पादक शेतकऱ्यांची शासकीय धान खरेदी केंद्रावरून प्रचंड लूट केली जात आहे. यासोबतच धानाचे उत्पादन घेण्यासाठी वीजपुरवठा नियमीत असणे आवश्यक आहे. मात्र, तो राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीकडे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसद सभागृहाचे लक्ष वेधले.