सावध व्हा, सॅनेटायझर दान देण्याच्या नावावर तरुणास बसला मोठा फटका, वाचा हा प्रकार...

name of giving sanitizer, young man was robbed by 24 thousand
name of giving sanitizer, young man was robbed by 24 thousand

अमरावती : स्वत:ला इंडियन आर्मीमधून बोलत असल्याचे सांगून सॅनिटायझर व मास्क दान करायचे आहे, अशी बतावणी करून तोतयाने पूर्णानगर येथील युवकाची 24 हजारांनी फसवणूक केली. शुभम मनोहर अग्रवाल (वय 26, रा. पूर्णानगर, अमरावती) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

कोरोनामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वारंवार हात धुण्यासोबतच सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, असे सांगितले जाते. कोरोना रुग्णांच्या सेवेत तत्पर असलेले डॉक्‍टर, आरोग्य सेवक यांच्यासह इतरांना मास्क, सॅनेटायझरचे दान करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था सरसावतात. त्यातच काही दानदातेही या कामासाठी पुढाकार घेत आहेत.

विदर्भातील अनेक सेवाभावी संस्थासह नागरिकही आपल्या घरचे कार्यक्रम रद्द करून कोरोना योद्‌ध्यांसाठी आपापल्या परीने मदत करीत आहेत. अनेक ठिकाणी श्रमिक, गरजू, गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय केली जाते. त्याच पार्श्‍वभूमीवर शुभम अग्रवाल यास 24 मे रोजी 9992205987 या क्रमांकाच्या मोबाईलधारकाने संपर्क साधला. फोन करणाऱ्याने स्वत: आर्मीमधून बोलत असल्याचे सांगून आधीच विश्‍वास संपादन केला.

त्याने सॅनिटायझर व मास्क दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी आवश्‍यक असलेला कोडनंबर व्हॉट्‌स ऍपवर शुभम यास पाठविला. त्यानंतर त्याला स्कॅन करण्यास सांगितले. शुभमने तोतयाने सांगितल्याप्रमाणे कृती केली. काही मिनिटातच त्याच्या बॅंक खात्यामधून चोवीस हजारांची रोकड तोतयाने ऑनलाइन लंपास करून फसवणूक केली.

त्यानंतर आर्मीच्या तोतया कर्मचाऱ्याने आपला मोबाईल क्रमांकसुद्धा स्वीच ऑफ केला. लुबाडणूक झाल्याचे लक्षात येताच, शुभमने ग्रामीणच्या सायबर ठाण्यात तक्रार नोंदवली.


पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या विविध संस्था, संघटना मदतीसाठी सरसावल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांनी सावध राहून, संपूर्ण विचारपूस आणि खात्री केल्यावर संबंधितांवर विश्‍वास ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com