लायसन्स युवकाचे फोटो युवतीचा

अनिल कांबळे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नागपूर : राज्यातील परिवहन विभागाचा (आरटीओ) भोंगळ कारभार दिवसेंदिवस उघडकीस येत आहे. डिजिटल होण्यापासून आरटीओ कार्यालय लांब राहण्याचा प्रयत्न करीत आहे. एका युवकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर चक्‍क युवतीचा फोटो असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयातील "काळाबाजार' बाहेर निघण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

परिवहन विभागातील आरटीओ कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन यंत्रणेचा फज्जा उडाल्याचे राज्यभरात प्रत्ययास येत आहे. राज्यातील आरटीओचा सर्व कारभार ऑनलाइनच्या चालविण्याच्या धोरणात कार्यालयातील अपुरे कॉम्प्युटर, नेटची मंदगती, प्रशिक्षणाचा अभाव, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि कर्मचाऱ्यांमधील नकारात्मक धोरण यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. या अडचणींमुळे आरटीओ कार्यालयांप्रमाणेच वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. राज्यभरातील आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसनपासून गाड्यांच्या नोंदणीसह संबंधित सर्व कामे सारथी आणि वाहन नावाच्या सॉफ्टवेअरच्या आधारे केली जातात. केंद्र स्तरावरून देशभरातील आरटीओ कार्यालयांसाठी ही सॉफ्टवेअर पुरविण्यात आली आहे. वाहन नोंदणीची सर्व कामे ऑनलाइन करण्याचा स्तुत्य हेतू प्रात्यक्षिक अडचणींनी मंदावला आहे. या दोन्ही सॉफ्टवेअरच्या साहाय्याने लागलीच नोंद होण्यात कोणतीही अडचण नाही. पण, प्रत्येक आरटीओ कार्यालयातील नेट पुरविण्यात आले आहे. परंतु, आरटीओ कार्यालयातील ताण या वेगासाठी अपुरा ठरतो. आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स, वाहननोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट अशी असंख्य कामे सुरू असतात. नेटमुळे नोंदणी करण्यास उशीर होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
फोटो आणि माहितीमध्ये तफावत
एम-परिवहन आणि डीजीलॉकर या दोन्ही मोबाईल ऍप्सवर अपलोड केलेल्या वाहनांचे कागदपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्समध्ये अनेक चुका आहेत. ऍप्समधील माहितीमध्ये फोटो आणि माहितीमध्ये तफावत आहे. तसेच वाहनांची क्रमांक चुकीचे दिलेले आहेत. तर अनेक वाहनांचे इंशुरन्स असतानाही माहिती दाखविल्या जात नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: name of youth but photo of lady on liscence