राज्यातील ‘ईडी’ सरकारचे गुजरातसाठी काम : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole criticize eknath shinde devendra fadanavis  ED for government of Gujarat amravati

राज्यातील ‘ईडी’ सरकारचे गुजरातसाठी काम : नाना पटोले

अमरावती : राज्यात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, दुष्काळ अशा भीषण समस्या असताना त्यावर चर्चा होत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ गुजरातसाठी काम करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला. शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मेळाव्यास नाना पटोले अमरावतीस आले होते.

या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पटोले म्हणाले, की जुलै ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची अपरिमित हानी झाली असताना शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यातील ईडी सरकार गुजरातच्या विकासासाठी काम करीत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करता आलेला नाही. महाराष्ट्राचे सरकार मोदी-शहा चालवत आहेत.