Railway Ticket: सणासुदीच्या गर्दीत तिकीट तपासणीचा धडाका;रेल्वेच्या तिकीट तपासणीत २,९१७ प्रकरणे उघड; २५.७५ लाखांचा दंड वसूल

Railway Ticket Checking Drive : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दोन दिवसांच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट व अनियमित प्रवासाची २ हजार ९१७ प्रकरणे आढळली. भाडे आणि दंडापोटी २५ लाख ७५ हजार ९४० रुपये वसूल करण्यात आले.
Railway ticket inspection drive conducted by the Nanded division to curb ticketless and irregular travel

Railway ticket inspection drive conducted by the Nanded division to curb ticketless and irregular travel

esakal

Updated on: 

अकोला : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली. सलग दोन दिवस राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल २ हजार ९१७ प्रकरणे उघडकीस आली असून, भाडे आणि दंडापोटी २५ लाख ७५ हजार ९४० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मोहिमेत अकोल्याच्या विभागीय फ्लाइंग स्क्वॉडनेही महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.

Loading content, please wait...