

Amravati
esakal
अमरावती: मौजे नांदगावपेठ क्षेत्रातील अमरावती अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील नारायणपूर येथील जमिनीमध्ये पाण्याचा एचपी, सोडियम, क्लोराइड तसेच पोटॅशियमचे प्रमाण वाढल्याने येथील जमीन पर्यावरणाच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याचा अहवाल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील ४७.८९ हेक्टर आर. जमिनीच्या भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून या भागातील औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दा किती गंभीर बनला आहे, हे स्पष्ट झाले आहे.