सावनेर-पांढुर्णा मार्गावर भरधाव वाहन उलटून दोघांचा मृत्यू; सात गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

सावनेर/केळवद : जिनिंगमधील कामगारांना घेऊन येणारे भरधाव वाहन उलटल्याने त्यातील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-बैतुल राष्ट्रीय महामार्गावरील छत्रापूर शिवारात दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. 

सावनेर/केळवद : जिनिंगमधील कामगारांना घेऊन येणारे भरधाव वाहन उलटल्याने त्यातील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-बैतुल राष्ट्रीय महामार्गावरील छत्रापूर शिवारात दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. 

मारोतराव मन्नू सरयाम (वय 35, रा. अंबाडा, ता. पाढुर्णा) व विनोद भीमराव राऊत (वय 30, रा. पांढुर्णा) यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित सात गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या पांढुर्णा तालुक्‍यातील नऊ कामगार सावनेरनजीकच्या एका जिनिंगमध्ये कामावर जात होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास छत्रापूर शिवारात मजुरांचे वाहन पोहोचले. महामार्गावरून भरधाव येताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या खाली आले व उलटले. यात बसलेले सात मजूर गंभीर जखमी झाले तर दोघांचा जागीच मृत्यू झाला. सातपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. 

जखमींमध्ये वीरेंद्र कचरू मलकाम (वय 23), रामनाथ शंकर खंडाते (वय 19), दिनेश अनंत खंडाते (वय 35), अंबालाल परसराम उईके (वय 40), दुर्गादास रामेश्‍वर उईके (वय 25) सोमखलाल नामदेव खंडाते (वय 30 हे सर्व राहणार ढोलणखापा, पांढुर्णा) व पुंडलिक नत्थू कुंभरे (वय 40, रा. अंबाडा) हे गंभीर जखमी झालेत. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नागरिकांच्या साहाय्याने वाहनाला सरळ करून जखमींना उपचारासाठी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास केळवदचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई राजू रेवतकर, गुणवंत डाखोळे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: napur, accident, two dead