गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आंदोलन

विवेक मेटकर
सोमवार, 4 जून 2018

राष्ट्रवादी महिला कांग्रेस पक्षाच्या वतीने तेल्हारा तहसील कार्यलयासमोर गॅस दरवाढीच्या विरोधात चुलीवर भाकरी टाको आंदोलन करण्यात आले. आज (ता.4)  नायब तहसीलदार दिपक झरे यांना चटनी भाकरीसह निवेदन सादर करण्यात आले.

तेल्हारा (अकोला) - राष्ट्रवादी महिला कांग्रेस पक्षाच्या वतीने तेल्हारा तहसील कार्यलयासमोर गॅस दरवाढीच्या विरोधात चुलीवर भाकरी टाको आंदोलन करण्यात आले. आज (ता.4)  नायब तहसीलदार दिपक झरे यांना चटनी भाकरीसह निवेदन सादर करण्यात आले.

अकोला जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा अध्यक्षा पद्माताई मोहन अहेरकर, महिला तालुका अध्यक्षा आशाताई ढोले, महिला शहराध्यक्ष मनीषाताई देशमुख, वैशाली इंगले, तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले सर माजी शहर अध्यक्ष सुरेश दायमा, माजी तालुका अध्यक्ष विनोद मिरगे शहर अध्यक्ष कैलास ठोकने, युवक शहर अध्यक्ष दिलीप पिवाल, कोषाध्यक्ष अनिता वाडेकर वैशाली ताई ओले आणि इतर पदादिधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी गॅस दरवाढीचा तीव्र निषेध केला आहे.

Web Title: Nationalist Congress Party's agitation against gas price hike