esakal | हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet and Ravi Rana performance is zero, ShivSena office bearers allege

दीड ते दोन वर्षांचा कालावधी पाहता राणा दाम्पत्याकडून कुठलीही ठोस कामे झालेले नाहीत. हे जनतेलाही कळून चुकले आहे. मेळघाटमध्ये समस्यांचा डोंगर असताना खासदार म्हणून नवनीत राणा यांनी आजवर काय केले, त्या केवळ पीकनिककरिता मेळघाटात जात असतात

हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप 

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार म्हणून रवी राणा यांची कामगिरी शून्य आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी राणा दाम्पत्याने मेळघाटात जाऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेत. राणा दाम्पत्याची ही नौटंकी असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.12) पत्रकार परिषदेत केला. 

जिल्हाप्रमुख प्रवीण हरमकर आणि श्‍याम देशमुख यांनी सांगितले की, दीड ते दोन वर्षांचा कालावधी पाहता राणा दाम्पत्याकडून कुठलीही ठोस कामे झालेले नाहीत. हे जनतेलाही कळून चुकले आहे. मेळघाटमध्ये समस्यांचा डोंगर असताना खासदार म्हणून नवनीत राणा यांनी आजवर काय केले, त्या केवळ पीकनिककरिता मेळघाटात जात असतात, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. 

हेही वाचा - ज्येष्ठांना सोडून कनिष्ठांना ‘ठाणेदारी’?; ज्युनिअर जोमात, सीनिअर कोमात
 

स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यापूर्वीसुद्धा आमदार रवी राणा यांनी आपल्यासोबत 25 आमदार असल्याचा दावा केला होता, मात्र कालांतराने तो पुढे खोटा निघाला. बडनेरा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. मेळघाटात काम करण्यात भरपूर वाव आहे, असे असताना खासदार आणि आमदार म्हणून राणा दाम्पत्याचे कुठलेही भरीव योगदान दिसत नाही. मेळघाटच्या प्रवासादरम्यान एसटीचे दार उघडे करून मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करून राणा दाम्पत्य स्टंटबाजी करीत असल्याचे व्हिडिओवरून दिसून येते, असा आरोप प्रवीण हरमकर यांनी केला. 

बडनेरा येथे उघडकीस आलेला कोट्यवधींचा शौचालय घोटाळा, मनपातील इतर प्रश्‍नांबाबत आमदार राणा यांनी चुप्पी का साधली?, असा प्रश्‍नसुद्धा त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला प्रदीप बाजड, आशीष धर्माळे, राहुल माटोडे, प्रकाश मंजलवार, गोपाळ मंजलवार, पंजाब तायवाडे, आशीष ठाकरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
 

जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली
खरे जनसेवक कोण, याची प्रचिती शिवसेनेला आली आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. विधानसभेचा सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडत आहोत. मुख्यमंत्री फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत आहेत, तर आम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आहोत. हा फरक आहे. टीका करणाऱ्यांना यापूर्वी जनतेने त्यांची जागा दाखविली आहे.
-रवी राणा, आमदार, बडनेरा

संपादन  : अतुल मांगे 
 

loading image