esakal | नक्षल दलम मध्ये आता स्थानिक विरुद्ध परप्रांतीय संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

In the Naxal Dalam now the foreign struggle against the locals

एटापल्ली तालुक्‍यातील येलदमडी जंगल परिसरात चार दिवसापूर्वी पोलिस-नक्षल्यात झालेल्या चकमकीत पेरमिली नक्षल दलमचा कमांडर कोटे उर्फ शंकर ठार झाला. त्याच्या नेतृत्वात अहेरी उपविभागात नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया सुरू केल्या होत्या. साईनाथ ठार झाल्यानंतर पेरमिली दलमचे सूत्र त्याच्याकडे आले होते. कस्नासूरच्या घटनेनंतर जिल्ह्यातील अनेक दलम संपुष्टात आले होते. या घटनेत काही जहाल नक्षलवाद्यासह 40 नक्षली ठार झाले होते. अहेरी उप विभागात आजवर झालेल्या मोठ्या घटनांमध्ये साईनाथची भूमिका महत्त्वाची राहिली.

नक्षल दलम मध्ये आता स्थानिक विरुद्ध परप्रांतीय संघर्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : हिंसक कारवायांत तरबेज असलेले पेरमिली नक्षल दलम पुन्हा पोलिसांच्या चक्रव्युहात सापडले आहे.कस्नासूर घटनेतून सावरलेल्या या दलमने पुन्हा अहेरी उपविभागात धुडगूस घातला आहे. वाहनांची जाळपोळ, हत्या व कंत्राटदाराकडून खंडणी वसुलीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पेरमिली दलमला शंकरच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
एटापल्ली तालुक्‍यातील येलदमडी जंगल परिसरात चार दिवसापूर्वी पोलिस-नक्षल्यात झालेल्या चकमकीत पेरमिली नक्षल दलमचा कमांडर कोटे उर्फ शंकर ठार झाला. त्याच्या नेतृत्वात अहेरी उपविभागात नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया सुरू केल्या होत्या. साईनाथ ठार झाल्यानंतर पेरमिली दलमचे सूत्र त्याच्याकडे आले होते. कस्नासूरच्या घटनेनंतर जिल्ह्यातील अनेक दलम संपुष्टात आले होते. या घटनेत काही जहाल नक्षलवाद्यासह 40 नक्षली ठार झाले होते. अहेरी उप विभागात आजवर झालेल्या मोठ्या घटनांमध्ये साईनाथची भूमिका महत्त्वाची राहिली. त्याच्याच नेतृत्वात पेरमिली उपपोलिस ठाण्यावर गोळीबार तसेच आठवडी बाजारात घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात तीन पोलिस अधिकारी शहीद झाले होते. तर एका सीआरपीएफ जवानाची गोळी घालून हत्या केली होती. येरमणार गावात सरकारी आश्रम शाळेच्या नवीन इमारतीची तोडफोड केल्याने सदर शाळा इतरत्र हलविण्यात आली. नक्षलवाद्यांच्या भीतीने बांधकाम कंत्राटदाराने शाळा इमारतीचे काम बंद केले.अहेरी, एटापल्ली व भामरागड तालुक्‍यात हैदोस घातल्यामुळे पेरमिली नक्षल दलम पोलिसांच्या रडारवर होते. दोन वर्षापूर्वी एटापल्ली तालुक्‍यातील सुरजागड पहाडावर नक्षलवाद्यांनी 82 वाहनांची जाळपोळ केली होती.

क्लिक करा - कोरोना मास्कवरती पैठणीचा मोर नाचरा हवा...आता मास्कच्याही नाना तऱ्हा तस्करी करणाऱ्यांना अटक

यातही पेरमिली दलमचा सहभाग होता. अहेरी उप विभागातील अनेक गावात रस्ते व पुलाची सोय नसल्यामुळे नक्षलवाद्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. मात्र,साईनाथ ठार झाल्यानंतर स्थानिकांकडून पेरमिली दलमला पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याने या दलमला छत्तीसगड राज्यातील सदस्यांचा आधार घ्यावा लागला. यामुळे नक्षल दलममध्ये आता स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

loading image