२६ नव्हे तर २७ नक्षलवाद्यांना कंठस्थान; आणखी एका नक्षल्याचा मृतदेह सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naxal Flint

२६ नव्हे तर २७ नक्षलवाद्यांना कंठस्थान; शोधमोहीम सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्याच्या गॅरापत्ती-कोटगूल जंगल परिसरातील मर्दीनटोला गावाजवळ १३ नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या सी-६० दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले होते. या परिसरात शोधमोहीम राबवीत असताना पोलिसांना आणखी एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. त्यामुळे या चकमकीतील मृत नक्षलवाद्यांची आता संख्या २७ झाली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी मर्दीनटोला गावाजवळ झालेल्या चकमकीच्या ठिकाणी पोलिस मंगळवार (ता. १६) शोधमोहीम राबवीत असताना त्यांना हत्यारासह एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली आहे. सुखलाल ऊर्फ रामसाय बिसलाल परचाकी (वय ३३, रा. कोसमी नं. १, सावरगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत ता. धानोरा) असे त्याचे नाव असून, तो डीव्हीसी मेंबर आहे. घटनास्थळी अद्याप शोधमोहीम सुरू असून आणखी नक्षल्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: वि. प. निवडणूक : महाविकास आघाडीविरुद्ध भाजपला उमेदवार मिळेना!

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल या घनदाट जंगल परिसरात पोलिसांचे सी-६०चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी पाहटे जोरदार गोळीबार झाली. या गोळीबारात २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. रविवारी सायंकाळपर्यंत २६ मृतदेह आढळले होते. मंगळवारी शोधमोहीम राबवित असताना आणखी एका नक्षलावाद्याचा मृतदेह आढळून आला. आज आणखी एक मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या २७ झाली आहे.

loading image
go to top