संचारबंदीत गडचिरोलीत नक्षलवादी सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

सर्वत्र कोरोनाच्या विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे पोलिस नाकाबंदी व वाहतुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच फायदा घेण्यासाठी नक्षलवादी जिल्ह्याच्या काही भागात सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
 

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आठवडाभरात एका व्यक्तीची हत्या व चकमक घडवून आणली. त्यामुळे नक्षल विरोधी अभियान पथकाने नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात आपले अभियान तेज केले आहे.

कोरची तालुक्‍यातील नवेझरी येथील माजी उपसरपंच याची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर धानोरा तालुक्‍यातील कारवाफा पोलिस मदत केंद्रांतर्गत रेखाटोला जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात एक जवान जखमी झाला.

पोलिस कोरोनाच्या बंदोबस्तात

गडचिरोली पोलिस सध्या कोरोनाच्या बंदोबस्तात आहेत. याशिवाय गरजूंना मदत करण्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न करीत आहेत. याच संधीचा फायदा घेऊन घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवादी जिल्ह्याच्या काही भागात सक्रिय झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनमध्येही त्याने आईची अखेरची इच्छा केली पूर्ण, मात्र...

नक्षल चळवळीला मोठा धक्का

गेल्या वर्षभरात नक्षल विरोधी अभियानामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या चळवळीतील काही मोठ्या नेत्यांनी पोलिसांपुढे आत्मसर्पण केल्याने गडचिरोली जिल्ह्यात नक्षल घटनांत कमी आली. हिंसक कारवाई करण्यात अग्रेसर असलेले काही नक्षल दलम जवळपास संपुष्टात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalites active in Gadchiroli