गोंडपिपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बँनर फाडले; कार्यकर्त्यांत संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जनसामान्यांशी जुळवून घेण्याकरिता विविध ठिकाणी रँलीव्दारे वातावरण निर्मीती करीत आहे.

गोंडपिपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बँनर फाडले; कार्यकर्त्यांत संताप

बँनर फाडणारे नेमके कोण याचा शोध आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घेत आहेत. गोंडपिपरीत पोलीसांनी लावलेली सिसिटिव्ही व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रात्री होत असलेले गुन्हे उजेडात येत नाही. त्यामुळे तात्काळ सिसिटिव्ही व्यवस्था सूरळीत करण्याची मागणी समोर येत आहे. स्वागताचे बँनर फाडल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकले. त्यांनी ठाणेदारांना याची माहिती दिली.

बँनर फाडून विरोधकांना आनंद झाला असेल. पण अशापध्दतीन विरोध करणे हे अशोभनीय आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकत वाढत आहे.अनेक युवक आमच्यासोबत जुळत आहेत.

- महेंद्रसिंह चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस