भाजप सरकार हे हुकूमशाहीचे; एकनाथ खडसे

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची टीका
NCP Eknath Khadse Criticism BJP government
NCP Eknath Khadse Criticism BJP government

वरुड : भाजप सरकार हे हुकूमशाहीचे सरकार आहे, दडपशाही करून लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज दाबण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे, असा आरोप विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे केला.

न.प.मराठी शाळेच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. आमदार देवेंद्र भुयार यांनी कुठल्याही दबाव व आमिषाला बळी न पडता मला विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यामुळेच आपण निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत काही कारण नसताना विरोधकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, परंतु संस्थेच्या आजीवन सभासदांनी माझी अध्यक्षपदी निवड करून त्यांना प्रत्युत्तर दिले, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

या प्रसंगी आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन देशमुख यांच्यावर टीका सहन करणार नाही असा इशारा दिला. आमदार नीलेश लंके यांनी सुद्घा उपस्थितांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, संगीता ठाकरे, माजी जि.प.अध्यक्षा सुरेखा ठाकरे, सुशील गावंडे, नरेंद्र खंडेलवाल, डॉ. प्रवीण चौधरी,

माजी न.प.उपाध्यक्ष महेंद्र देशमुख, समीर अली, रमेश वडस्कर, प्रमोद उङ्र्क बाळू पाटील, माजी पं.स.सभापती नीलेश मगर्दे, कमलाकर पावडे, राजाभाऊ कुकडे, अ‍ॅड. प्रणिता चव्हाण, जितेन शाह, शैलेश देशमुख, जगदीश काळे, मेघना मडघे, सै.गुफरान, कैसर जहा, आकाश बेलसरे, आशिष श्रीराव, राजेंद्र बहुरूपी, सुशीला कुकडे

ज्ञानेश्वर यावले, विष्णुपंत निकम, सुभाष शेळके, नंदकिशोर घोरमाडे, डॉ. विजय देशमुख, हर्षल गलबले आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन ठाकरे यांनी तर प्रास्ताविक स्वप्नील आजनकर यांनी केले. उपस्थितांचे आभार हर्षल गलबले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ऋषीकेश राऊत, सूरज वडस्कर, अजय चोरोडे, रोशन दारोकर, आदींनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com