ने मजसी ने परत मात्रुभुमीला; त्या विद्यार्थ्यांची आर्त हाक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अडचणीतून सोडविण्याची विनंती केली आहे. गडचिरोलीतील प्रतीक्षा साळवे आणि सृष्टी बेहेरे या दोन विद्यार्थिनींसह नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे 36 विद्यार्थी 15 डिसेंबर रोजी मलेशिया येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. मलेशिया येथील ईपो आणि पेनांग या दोन शहरांमध्ये हे विद्यार्थी सध्या मुक्कामी आहेत.

गडचिरोली : गडचिरोलीतील दोन विद्यार्थिनींसह विदर्भातील 36 विद्यार्थी मलेशियात अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे असून 15 डिसेंबरला सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी मलेशियाला गेले होते. मात्र, 25 मार्च रोजी मलेशियातदेखील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊनमुळे प्रशिक्षण कालावधी चार महिन्यांवर आणत विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु त्याच काळात भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केल्याने हे विद्यार्थी मलेशियात अडकले आहेत.

अवश्य वाचा - नागपुरात कोरोना वाढला; हे परिसर केले ‘सील’

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अडचणीतून सोडविण्याची विनंती केली आहे. गडचिरोलीतील प्रतीक्षा साळवे आणि सृष्टी बेहेरे या दोन विद्यार्थिनींसह नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे 36 विद्यार्थी 15 डिसेंबर रोजी मलेशिया येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. मलेशिया येथील ईपो आणि पेनांग या दोन शहरांमध्ये हे विद्यार्थी सध्या मुक्कामी आहेत. यात सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. मलेशियातील 2 फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना अचानक लॉकडाऊन जाहीर झाले. ही समस्या ओळखून लागलीच या विद्यार्थ्यांनी 22 एप्रिलची परतीची तिकिटे आरक्षित केली. मात्र, ते भारतात परतु शकले नाहीत. सध्या या विद्यार्थ्यांची स्थिती वाईट झाली आहे. ज्या ठिकाणी ते निवासाला आहेत. तिथल्या जीवनावश्‍यक सर्व वस्तू संपल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सोबत नेलेले पैसेही संपले आहेत. तेथील बाजारात वस्तू मिळत असल्या तरी त्या अत्यंत महागड्या आहेत. अशा स्थितीत मलेशिया येथे वास्तव्य करणे आता त्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. या विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडीयावर टाकला असून या माध्यमातून त्यांनी संकटातून सोडविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. दरम्यान तिरपुडे कॉलेजच्या प्राचार्यांनी पंतप्रधान मोदींना यासंबंधी विनंती केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मलेशिया येथे अडकलेल्या या विद्यार्थ्यांची मदत कोण व कशी करणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ne Majisi returned to Merebhumi; Call on the students