

नांदुरा : क्षुल्लक कारणावरून सख्ख्या काकांसोबत वाद घालत कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून पुतण्याने काकांची हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. २९ मार्च) सकाळी शहरापासून नजीकच असलेल्या सोनज येथे घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.