उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग राबवतेय अनोखी मोहिम

tur.
tur.
Updated on

नागपूर : लागवडीनंतर ठराविक कालावधीत तुरीचे शेंडे खुडणे फायदेशीर ठरते. असे केल्याने शेंगा चांगल्याप्रकारे भरतात. सोबतच फळ फांद्यांची देखील वाढ होते. त्यामुळे या हंगामात कृषी विभागाने शेंडे खुडणी विषयक जागृतीवर भर दिला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात याकरता विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. जोखीम कमी करण्याकरता अशा प्रकारचा पीक पॅटर्न पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी अवलंबिला आहे. दरवर्षी हंगामात सोयाबीनने निराश केल्यानंतर शेतकऱ्यांना तूरीचा आधार उरतो.

यावर्षीदेखील सोयाबीनवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढला असताना शेतकऱ्यांना तूर पिकातून उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तूर पिकाच्या उत्पादकता वाढीवर छोट्या छोट्या बाबीच्या माध्यमातून भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये तुरीचे शेंडे खुडणे या तांत्रिक प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.

लागवड क्षेत्र हेक्टरमध्ये (चौकटीत टक्केवारी)

  • बुलडाणा - ७० हजार ३४९ (९२)
  • अकोला - ५८ हजार १२ (१०४)
  • वाशीम - ५५ हजार ५६८ (१०२)
  • अमरावती - १ लाख ७६ हजार ८ (९७)
  • यवतमाळ - १ लाख १० हजार ९६५ (८२)

शेंडे खुडणीला प्रोत्साहन
इक्रीसॕटने तुरीचे शेंडे खुडण्याची शिफारस केली आहे. तूर शेंगांना पोषक द्रव्य मिळतात व शेंगा चांगल्या प्रकारे भरण्यास उपयोग होतो सोबतच इतरही फायदे या छोट्याशा तंत्राचे आहेत त्यामुळे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात शेंडे खुडणीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
 सुभाष नागरे
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

सविस्तर वाचा - त्वरा करा त्वरा! २ सप्टेंबरपासून महानिर्मितीची पदभरती प्रक्रिया

सकारात्मक परिणाम
विद्यापीठ प्रक्षेत्रावर गेल्या तीन वर्षापासून शेंडे खुडणीचे प्रयोग सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यानुसार विद्यापीठाने पंचेचाळीस आणि ६५ दिवसांनी अशी दोनदा शेंडे खुडणीची शिफारस केली आहे. फळ खांद्याची वाढ होते हे पहिले निरीक्षण आहे. त्यासोबतच शेंडे खुडल्याने झाडांची उंची कमी होते. त्यामुळे शेंगांना अन्नद्रव्य मिळून त्या चांगल्या प्रकारे भरतात. परिणामी ही छोटीशी बाब मोठ्या फायद्याची ठरू शकते.
 एन. आर. पोटदुखे, तूर पीक तज्ज्ञ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com