सावनेर पोलिस झाले खुश; भाड्याने राहणाऱ्या कर्मचारी कुटुंबांना मिळणार सुंदर घर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

कर्तव्य बजावण्यात व्यस्त असणारे पोलिस कुटुंब, नातेवाईक व मित्रमंडळी यापासून दुरावले जातात त्यांचा सामाजिक रास होतो, असे पोलिस कर्मचारी अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेतील धोकादायक निवासी गाळ्यांमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत होते. 

सावनेर, (जि. नागपूर) : येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या जीर्ण वसाहतीला पाडून नवीन बांधकामाला सुरुवात झाली आहे. यामुळे पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. या बहुमजली बांधकामामुळे शहरातील सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. 

शहरात तहसील कार्यालय न्यायालयीन इमारत पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आणि पाटबंधारे विभागाचे कार्यालय व वसाहतीचे आधुनिक बांधकाम झाले. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारीसाठी सण उत्सव, निवडणुका याप्रसंगी आपले कर्तव्य बजावण्यात व्यस्त असणारे पोलिस कुटुंब, नातेवाईक व मित्रमंडळी यापासून दुरावले जातात त्यांचा सामाजिक रास होतो, असे पोलिस कर्मचारी अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेतील धोकादायक निवासी गाळ्यांमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत होते. 

वसाहतीमध्ये बाल उद्यान व पार्किंगची व्यवस्था

येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत रेंगाळलेला पोलिसांच्या निवाऱ्यांचे प्रश्‍न उशिरा का होईना, पण, आता पोलिस विभागाने बांधकामाला सुरुवात केल्यामुळे ते मार्गी लागणार आहे. यामुळे पोलिस कर्मचारी सुखावले आहेत. एवढेच नव्हे तर सोई सुविधायुक्त गाळ्यांचे यात असतील. यासाठी दोन इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. या इमारतीचे सात मजली बांधकाम होत आहे. एका इमारतीमध्ये 28 गाळे याप्रमाणे दोन्ही इमारतीमध्ये एकूण 56 गाळ्यांची व्यवस्था आहे. पोलिसांच्या वसाहतीमध्ये बाल उद्यान व पार्किंगची व्यवस्था राहणार आहे त्यामुळे ही वसाहत शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालणार आहे. 

पोलिस ठाणे नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत

नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सावनेर पोलिस स्टेशन नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी ही शहरात भाड्याने वास्तव्य थाटले आहे. ठाण्यातील कारभार चालविण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने सध्या आरोपीकरिता लॉकअप उपलब्ध नसल्याने इतर ठाण्यात आरोपी ठेवावे लागत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Colony of Police in Savner