धोका वाढतोय! विदर्भातील आणखी ५ जिल्ह्यात 'डेल्टा प्लस'चा शिरकाव

delta plus
delta plusesakal
Updated on

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेंरियंटचे (delta plus variant) नवे संकट उभे ठाकले आहे. नव्हेतर हे संकट नजरेसमोर दिसत आहे. विदर्भात डेल्टा प्लसचे सुमारे २१ रुग्ण (delta plus variant vidarbha) आढळले असून यापैकी ५ शहरातील आहेत. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

delta plus
रसायनशास्त्र विभाग प्रमुखांची आत्महत्या, पतीच्या मृत्यूनंतर होता मानसिक तणाव

नागपूर जिल्ह्यात ५ नवीन स्वरुपातील हे रुग्ण आढळले आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यात ६, अमरावतीमध्ये ६, यवतमाळात ३ आणि भंडारा जिल्ह्यात १ असे डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नागपूर, गडचिरोली, भंडारा या तिन्ही जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घसरले होते. मात्र, अचानक डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

आतापर्यंत हजारावर नमुने -

मुंबईतून नागपुरात परतलेल्या तसेच संशयित कोरोनाबाधितांचे आतापर्यंत सातशेपेक्षा अधिक डेल्टा प्लस संशयितांचे हैदराबाद तसेच पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठवण्यात येत होते. याशिवाय दिल्ली येथेही काही नमुने पाठवण्यात आले होते. मात्र, नागपुरात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (निरी) येथे जिनोम सिक्वेसिंग करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मात्र आता कोरोनाच्या नवीन रूपाचे जीनोम सिक्वेन्सिंग सुरू झाले. नागपुरातील निरी लॅब येथे ऑक्टोबर महिन्यापासून जीनोम सिक्वेंसींग सुरू झाले असून एक हजारावर नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, यापूर्वी अकोला, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात देखील डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com