esakal | भले शाब्बास! पारंपरिक शेतीला फाटा देत नवरगावचे शेतकरी करताहेत नवा प्रयोग!
sakal

बोलून बातमी शोधा

korachi

कोरची तालुक्‍यातील नवरगाव येथील श्‍यामकुमार बालमुकुंद यादव, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या पाच एकर धानाच्या शेतापैकी एक एकर शेतीत मिश्र भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी नसल्याने योग्य नियोजन करून पीक पद्धतीत बदल करून भाजीपाला शेतीची निवड केली आहे. यावर्षी मान्सुनचा अपेक्षित पाऊस अद्याप झाला नाही.

भले शाब्बास! पारंपरिक शेतीला फाटा देत नवरगावचे शेतकरी करताहेत नवा प्रयोग!

sakal_logo
By
नंदकिशोर वैरागडे

कोरची (जि. गडचिरोली) : शेती हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून असा व्यवसाय आहे. अस्मानी संकट आले की शेतकरी हवालदिल होता. त्याचे मोठे आर्थिक नुकसान होते. तो कर्जाच्या डोंगराखाली पिचत जातो. पिढ्यानुपिढ्या शेतकऱ्यांची हिच परिस्थिती होती. आता मात्र नव्या पिढीचा शेतकरी नवीन तंत्रज्ञानासह आणि नव्या उमेदीसह शेतीकडे पाहतो आहे. प्रायोगिक शेती करतो आहे. असाच पारंपरिक पद्धतीला फाटा देत नवा प्रयोग गडचिरोली जिल्ह्यीाल एका शेतकऱ्याने राबविला.
दुर्गम भागांत आता शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून नवीन प्रयोग सुरू केले आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत कोरची तालुक्‍यातील नवरगाव येथील एका शेतकऱ्याने मिश्र भाजीपाला लागवडीचा प्रयोग केला आहे.

कोरची तालुक्‍यातील नवरगाव येथील श्‍यामकुमार बालमुकुंद यादव, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या पाच एकर धानाच्या शेतापैकी एक एकर शेतीत मिश्र भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी नसल्याने योग्य नियोजन करून पीक पद्धतीत बदल करून भाजीपाला शेतीची निवड केली आहे. यावर्षी मान्सुनचा अपेक्षित पाऊस अद्याप झाला नाही.

धानपिकाची रोवणी झाली नाही. अशावेळी जर धानपिकाने दगा दिला, तर पर्याय म्हणून वेळीच मिश्र भाजीपाला पीक घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे कोरची तालुक्‍यात स्वागत केले जात आहे. श्‍यामकुमारने उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करता येईल, याचा अभ्यास करून एक एकरमध्ये पॉलिथिन अंथरून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. त्यात कारले, भेंडी, काकडी, चवळी, दोडके, अशा भाजीपाल्याची लागवड केली आहे. या शेतीत श्‍यामकुमार यांना सव्वा दोन लाखापर्यंत खर्च आला. त्यांचे सर्व कुटुंब या शेतात कष्ट करतात. सर्व खर्च वजा जाता त्यांना चांगला नफा मिळेल, असा विश्‍वास श्‍यामकुमार यादव यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा - कोणी तोडले रुग्णालयाचे दार तर कोणी खुर्च्या.. 'त्या' प्रकारानंतर अमरावतीकरांचा संताप अनावर.. वाचा सविस्तर..

जिवामृतच्या प्रयोगाचे प्रशिक्षण...
श्‍यामकुमार यादव हे इथेच थांबले नाहीत. ते जमिनीची सुपीकता टिकून राहावी म्हणून पुढे सेंद्रीय शेतीचा विचार करीत आहेत . म्हणून त्यांनी जवळच्या काही कृषिमित्रांना आमंत्रित करून आपल्या घरातील सदस्यांना जिवामृत, घनामृत, दशपर्णी अर्क तयार करण्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली. त्यासाठी त्यांना झाडूराम हलामी, चमरू होळी यांनी मार्गदर्शन केले.

संपादन - स्वाती हुद्दार