esakal | ‘मुलाचा अपघात झाला, किती जखम झाली, पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही’; भीक मागण्याची नवी पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

A new method of begging in Amravati

काही सेकंदातच लोकांनी युवती व तिच्या आईला घेरले. काही कळायचा आत त्यांनी ‘मुलाचा अपघात झाला. त्याला किती जखम झाली.’ अस म्हणत पैसे मागायला सुरुवात केली. पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे ते भयभीत झाले. त्या ठिकाणी उपस्थित परिसरातील लोकांपैकी कुणाचीही युवतीला घेरणाऱ्या लोकांची समजूत काढण्याची हिंमत होत नव्हती.

‘मुलाचा अपघात झाला, किती जखम झाली, पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही’; भीक मागण्याची नवी पद्धत

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : साध्या-सरळ लोकांकडून जाणून-बुजून पैसे लुबाडण्याचे अनेक किस्से आपण रोजच ऐकत वा वाचत असतो. कोणी खोट बोलून, कोणी मदत म्हणून तर कोणी धमकी बजा इशारा देऊन पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करतात. कोणी साधूचा वेषात हातात देव घेत घरोघरो पैसे मागण्यासाठी जातात. यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र, अमरावती जिल्ह्यात घडलेला किस्सा काही ओरच आहे. चला तर जाणून घेऊया...

कोरोना व लॉकडाउनमुळे तसेही नागरिक कमीच घराबाहेर पडत आहेत. कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत असल्याने सावधान राहण्यासाठी नागरिकांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्या या निर्णयामुळे भिक्षेकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. कोणीही भीक देत नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मिळेल तिथून पैसे गोळा करण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

दिवस शनिवार... अमरावतीचा मालडेकडी रोड... मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मार्गाने एक युवती दुपारच्या सुमारास आईसोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाली... वाटेत अचानक एक जखमी मुलगा त्यांच्या दुचाकीसमोर येऊन झोपला. हे काय होत आहे ते माय-लेकींना समजलेच नाही. अवघ्या पाच मिनिटात भटक्या जमातीच्या २५ ते ३० महिला आणि पुरुषांनी दुचाकीस्वार युवतीला घेरले. त्यामुळे युवती व तिची आई घाबरली.

काही सेकंदातच लोकांनी युवती व तिच्या आईला घेरले. काही कळायचा आत त्यांनी ‘मुलाचा अपघात झाला. त्याला किती जखम झाली.’ अस म्हणत पैसे मागायला सुरुवात केली. पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे ते भयभीत झाले. त्या ठिकाणी उपस्थित परिसरातील लोकांपैकी कुणाचीही युवतीला घेरणाऱ्या लोकांची समजूत काढण्याची हिंमत होत नव्हती.

सविस्तर वाचा - रविवारपासून पाऊस झोडपणार, नुकसान टाळण्यासाठी करा पिकांचे नियोजन

कोणीतरी तातडीने शहर कोतवाली पोलिस ठाणे आणि नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. सीआर व्हॅनसह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर युवती व महिलेला जमावापासून वेगळे करण्यात आले. खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला दूर जाण्यास पोलिसांनी भाग पाडले.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top