esakal | साडी घेऊन देता की काढू सीटबेल्ट; सोशल मीडियावर खिल्ली
sakal

बोलून बातमी शोधा

traffic

'दहा हजार दंड घ्यायला रस्ते काय युरोपचे आहेत का?' असा प्रश्‍न अनेकांनी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर टाकला आहे. त्यावर अनेक मजेशीर उत्तरे नेटकऱ्यांकडून मिळत आहेत. कारमध्ये बसलेली पत्नी सरळ धमकी देत म्हणते, "साडी घेऊन देता की पोलिस दिसल्यावर सीटबेल्ट काढू', "मी भिकारी नाही, आत्ताच वाहतुकीचा दंड भरून आलोय,' असे अनेक चुटकुले चर्चित आहेत.

साडी घेऊन देता की काढू सीटबेल्ट; सोशल मीडियावर खिल्ली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मोटार वाहतूक कायद्यात दंडाची रक्‍कम दहापट वाढवल्याने हा विषय सध्या सोशल मीडियावर हॉट झाला आहे. 10 हजार दंड घ्यायला रस्ते युरोपचे आहेत का? इथपासून तर "किमान वेतन पाच हजार आणि दंड दहा हजार' असे कॉमेंट करून सरकारच्या धोरणाची खिल्लीही उडविली जात आहे.

एक सप्टेंबरपासून देशभरात वाहतूक नियमावलीत काही बदल करून केंद्र सरकारने 63 तरतुदी लागू केल्या. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करीत दंडाची रक्‍कम वाढविली आहे. दंडाची रक्‍कम जास्तीत जास्त 10 हजारांपर्यंत वाढविल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सरकार जिवावर उठले की काय? असा सवाल विचारला जात आहे. सोशल मीडियावर नव्या दंडावरून खिल्ली उडविली जात आहे. "पगार आठ हजार आणि दंड दहा हजार' अशी अवस्था असल्यामुळे दंड भरावा की कुटुंबाचे पालनपोषण करावे, असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे.

'दहा हजार दंड घ्यायला रस्ते काय युरोपचे आहेत का?' असा प्रश्‍न अनेकांनी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर टाकला आहे. त्यावर अनेक मजेशीर उत्तरे नेटकऱ्यांकडून मिळत आहेत. कारमध्ये बसलेली पत्नी सरळ धमकी देत म्हणते, "साडी घेऊन देता की पोलिस दिसल्यावर सीटबेल्ट काढू', "मी भिकारी नाही, आत्ताच वाहतुकीचा दंड भरून आलोय,' असे अनेक चुटकुले चर्चित आहेत, तसेच अनेक चित्रकारांनी व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

असे आहेत दंड
हेल्मेट-सीटबेल्ट - एक हजार रुपये
अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास - 25 हजार रुपये दंड, पालकांना शिक्षा
वाहनाचा विमा नसणे - दोन हजार रुपये
ड्रंक अँड ड्राइव्ह - 10 हजार रुपये


विना परवाना वाहन - 10 हजार रुपये
ट्रिपल सीट - 2 हजार रुपये
धोकादायकरीत्या वाहन चालविणे - 5 हजार रुपये

loading image
go to top