नववर्षात उगवणार "त्यांच्या' जीवनात नवी पहाट

Naxal sarender
Naxal sarender
Updated on

गडचिरोली : वर्ष 2019 मध्ये पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले आहे. विविध दलममध्ये कार्यरत 5 जहाल माओवाद्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. 31) पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या सर्वांच्या जीवनात आता नववर्षात नवी पहाट उगवणार आहे. या सर्वांवर सुमारे 27 लाख रुपयांचे बक्षीस होते. या पाच माओवाद्यांच्या शरणागतीमुळे वर्षभरात पोलिसांना शरण आलेल्या माओवाद्यांचा आकडा 34 झाला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

3 महिला, 2 पुरुषांचा समावेश 

स्थानिक पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले की, पोलिसांपुढे शरणागती पत्करणाऱ्यांमध्ये अजय ऊर्फ मनेसिंग फागुराम कुडयामी, राजो ऊर्फ गंगा ऊर्फ शशिकला सोमजी तुलावी, सपना ऊर्फ रुखमा दोनू वड्डे, गुन्नी ऊफ बेहरी ऊर्फ वसंती मनकेर मडावी व सुनील ऊर्फ फुलसिंग सुजान होळी यांचा समावेश आहे. यातील अजय ऊर्फ मनेसिंग कुडयामी हा प्लॉटून क्रमांक 3 चा उपकमांडर होता. 

वर्षभरात 34 माओवाद्यांची शरणागती 

2019 या वर्षात 1 कोटी 80 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एकूण 34 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. 22 माओवाद्यांना अटक, तर 9 माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. यंदा माओवाद्यांचे वरिष्ठ कॅडर शरणागती पत्करण्याचे प्रमाण अधिक होते. आतापर्यंत जेवढे डीव्हीसी शरण आले, त्यातील 50 टक्‍के डीव्हीसींची शरणागती यंदाची आहे. केवळ बंदुकीच्या गोळीने नक्षलवाद संपणार नाही, हे लक्षात आल्याने पोलिस विभागाने जनजागरण मेळावे, ग्रामभेटी आदींच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश येत असून माओवाद्यांचा जनाधार तुटत आहे. त्यामुळेच दलम सदस्य शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येत आहेत, असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग व सुदर्शन उपस्थित होते. 

आरक्षणाचा प्रस्ताव...

सरकार भूकंपग्रस्तांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण देते. गडचिरोली जिल्ह्यात भूकंपग्रस्त नाहीत. पण, माओवाद्यांनी ज्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना ठार केले किंवा ज्यांना भीती दाखवून गाव सोडायला लावले, असे अनेक नक्षलग्रस्त जिल्ह्यात आहेत. त्यांना गडचिरोलीसह राज्यभरातील नोकर भरतीत आरक्षण मिळावे, असा प्रस्ताव आपण राज्य सरकारला पाठविला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com