Vidarbha News: पुलांना सुरक्षा कठडे नसल्याने अपघात वाढले; कठडे बसविण्याची मागणीः सिंदखेड राजा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर असुरक्षीत

Unsafe Bridges on NH 753C in Sindkhed Raja: सिंदखेड राजा तालुक्यातील ७५३ सी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पुलांवर सुरक्षा कठडे नसल्याने अपघात वाढले आहेत.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

सिंदखेड राजा: सिंदखेड राजा तालुक्यातून जाणाऱ्या ७५३ सी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पुलांवर संरक्षणात्मक कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, प्रवाशांकडून तात्काळ कठडे बसवण्याची मागणी होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागा अंतर्गत सदरचा महामार्ग येतो. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सध्या गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आहे.तालुक्यातील लभान देव मंदिरा जवळ असलेला पूल, सावखेड तेजन ते पळसखेड चक्का दरम्यान असलेला पूल, पिंपळगाव लेंडी फाट्याजवळील दोन पूल,किनगांव राजा परिसरातील दोन पूल तसेच राहेरी येथील पूल या सर्व ठिकाणी कठडे पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com