NIA conducted a raid in amravati Sakal
विदर्भ
NIA Raid : अमरावतीत एनआयएचा छापा....एका युवक ताब्यात; पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा संशय
NIA conducted a raid in amravati : अमरावतीतील छायानगर भागात एनआयएने छापा टाकून एका युवकाला ताब्यात घेतले असून, त्याचा पाकिस्तानमधील संशयास्पद संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. या कारवाईत गोपनीयता पाळत युवकाची चौकशी सुरू आहे.
अमरावती : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज गुरुवारी (ता. १२ डिसें.) भल्या पहाटे शहरातील छायानगर परिसरात छापा टाकून एका युवकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईबाबत पोलिस यंत्रणेकडून गोपनीयता बाळगली जात आहे. त्यामुळे सदर युवकाचे नाव व त्याला ताब्यात घेण्याचे कारण याबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे.

