भाचानेच केला मामाचा खून; स्वत:च दिली पोलिसांना माहिती

dead_body
dead_body

नेर (यवतमाळ) : मामेबहिणीला फोन करून त्रास देत असल्याने मामाने हटकले. त्यामुळे संतापलेल्या भाचाने चुलत काकासोबत संगनमत केले. त्यानंतर कट रचून मामाच्या नाका, तोंडावर गंभीर मारहाण करून निर्घृण खून केला. ही घटना तालुक्यातील गोंडगव्हाण येथे काल गुरुवारी (ता. 4) रात्री घडली. घटनेनंतर संशयिताने स्वत:च नेर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली.

नारायण सेवा जाधव (वय 50, रा. गोंडगव्हाण) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाचा छगन श्रावण राठोड (वय 21, रा. गोंडगव्हाण), सुभाष बलदेव राठोड (वय 40, दोघेही रा. गोंडगव्हाण) या संशयितांना ताब्यात घेतले. छगन मामेबहिणीला फोन करून त्रास देत असल्याने मामाने त्याच्या या कृत्याला विरोध केला. त्यामुळे मामाचा काटा काढण्याचा कट छगन व सुभाषने रचला. दोघांनी नेरमध्ये मद्यप्राशन केले. त्यानंतर ऑटोत बसून नारायणचा गावापर्यंत पाठलाग केला. गोंडगव्हाणजवळ ऑटो पोहोचताच मामाला बाहेर काढून मारहाण करणे सुरू केले.

पळसाच्या झाडाचे टेंभे काढून नाका व तोंडावर जबर मारहाण केली. त्यात नारायण जाधवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर छगनने स्वत:च नेर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी खुशाल सेवा जाधव (वय 45) याने नेर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून छगन व सुभाष राठोडविरुद्घ गुन्हा नोंद केला. दोघांना रात्रीच अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणेदार अनिल किनगे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन पवार, जमादार लावरे, कासम पुढील तपास करीत आहेत.

दमदाटीमुळे काढला वचपा
मुलीला त्रास दिल्याच्या कारणातून मामा नारायण याने भाचा छगन याची दमदाटी केली होती. हाच राग मनात ठेवून छगनने मामाचा वचपा काढण्याचा कट आखला. त्यासाठी त्याने चुलत काका सुभाषशी संगनमत करून खून केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com