video : तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपींना नऊ दिवसांची पोलिस कोठडी

Nine-day police custody of accused in Tushar Pundkar massacre
Nine-day police custody of accused in Tushar Pundkar massacre

अकोट (जि.अकोला) :  प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडातील  आरोपींना  4 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना शुक्रवार, (ता.27) अकोट येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती.

 पनव नंदकिशोर सेंदानी, अल्पेश भगवान दुधे, शाम उर्फ स्वप्निल पुरुषोत्तम नाठे,  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या सूडभावनेतून ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी 50 हजार रुपयांचा रिवार्ड जाहीर केला. 

अकोटातील पोलीस वसाहतीजवळ तुषार फुंडकर यांची पुंडकर दूध डेअरी आहे. याठिकाणी ते 21 फेब्रुवारी २०२० रोजी रात्री दहा-साडे दहा वाजताच्या सुमारास मोबाईल फोनवर बोलत होते. त्यांना दोन दुचाकीस्वार आपल्याकडे येत असल्याचे दिसले. हल्ल्याची कुणकुण लागल्याने ते पोलीस वसाहतीकडे पळाले. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्या. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र पहाटे त्यांचा मृत्यू झाला.  

60 पोलिसांची सहा पथके होती मागावर
तुषार पुंडकर हत्याकांडाच्या छडा लागण्यासाठी 60 पोलिसांचे सहा पथके गठीत करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख शैलेष सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांच्या पथकाने हा तपास केला. तपास अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, तुषार पुंडकर हे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निकटवर्तीय होते.

भावाच्या हत्येचा बदला
तेजस सेदानी याची हत्या 2013 मध्ये झाली होती. तेजस यांचे गणेश मंडळ होते. त्याला तुषार पुंडकर यांचा विरोध होता. त्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यात तेजस याचा मृत्यू झाला होता. तुषार पुंडकर त्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी होते. त्या हत्येचा बदला म्हणून तेजसचा चुलत भाऊ पवन याने हे हत्याकांड घडवले, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com