नऊ वर्षांचा चिमुकला कानात सोन्याची बारी घालून शाळेत गेला अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

नऊ वर्षांचा चिमुकला शाळेत गेला. त्याचा कानात सोन्याची बारी होती. मात्र, शाळा सुटल्यावरही तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. तरीही तो सापडला नाही. शाळेच जाऊन बघितले असता चिंचेच्या झाडाखाली.... 

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या धामणगाव येथे उघडकीस आली आहे. शाळेच्या समोरच हा प्रकार घडला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुलाच्या कानात असलेली सोन्याची बारी गायब असल्याने बारीसाठीच चिमुकल्याचा खून झाला असावा असा कयास व्यक्‍त करण्यात येत आहे. घटनास्थळी गोंडपिपरीचे पोलिस दाखल झाले असून, श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उज्वल गेमाजी खेडेकार असे मृत मुलाचे नाव आहे. 

गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या चिंचेचा झाडाखाली उज्वल गेमाजी खेडेकार या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. उज्वलचा गळ्याला दुप्पटा आवळलेला होता. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा - कडाक्‍याच्या थंडीत "ती' होती विव्हळत आणि...

बुधवारी शाळा संपल्यावर उशिरापर्यंत उज्वल घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी व आजूबाजूच्या नातेवाईकांनी उज्वलचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान शाळेच्या समोरील भागात असलेल्या झाडाच्या खाली गळा आवळलेल्या स्थितीत उज्वलचा मृतदेह आढळून आला. यानंतर सर्व गाव एक झाले. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा अशा पद्धतीने खून केल्याने प्रचःड संताप व्यक्त करण्यात आला. 

चर्चेचा उधाण

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलाच्या कानात असलेली सोन्याची बारी गायप आहे. यामुळ बारीसाठीच त्याचा खून तर करण्यात आला नसावा, की दुसर काही कारण आहे याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र, परिसरात विविध चर्चेला अधाण आले होते.

अधिक माहितीसाठी - महिला सरपंचाने का ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप...वाचा

सर्वत्र हळहळ

काही दिवसांपूर्वीच अमरावतीत कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा खून झाला होता. त्यामुळे मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न चांगलाच ऐरणीवर आला होता. नागपुरातही एकाच दिवशी दोघांची हत्या करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी एका नेत्याच्या जावयाची हत्या झाली. यामुळे नववर्षाची सुरुवात खुनांनी झाल्याची चर्चा होती. चिमुकल्याच्या खुनाने सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine year child murdered in chandrapur